sukhsar3s.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे.!!!**+=**+=**+=**!!!sukhsar3s.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Monday, 20 April 2020

सम व विषम संख्या

सम व विषम संख्या


वाचा व समजून घ्या : 
1)   सम संख्या :- ज्या संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो, ती सम संख्या असते. सम संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो.
2)   विषम संख्या :- ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते, ती विषम संख्या असते. विषम  संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो.
3)   कोणतीही सम संख्या तिच्या आधीच्या सम संख्येपेक्षा 2 ने मोठी असते. एक सम संख्या m मानल्यास तिच्या लगतची पुढची सम संख्या (m + 2) व लगतची मागची सम संख्या (m - 2) ही असते.
4)   कोणतीही विषम  संख्या तिच्या आधीच्या विषम  संख्येपेक्षा 2 ने मोठी असते. एक विषम  संख्या m मानल्यास तिच्या लगतची पुढची विषम  संख्या (m + 2) व लगतची मागची विषम  संख्या (m - 2) ही असते.
·  दोन सम संख्यांची बेरीज सम संख्याच असते. उदा.  8 + 6 = 14 
·   दोन सम संख्यांचा गुणाकार सम संख्याच असतो. उदा.  4 × 6 = 24
·   दोन विषम  संख्यांची बेरीज सम संख्याच असते. उदा.  7 + 5 = 12
·  दोन विषम  संख्यांचा गुणाकार विषम  संख्याच असतो.   9 × 7 = 63
· दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने पूर्ण ( नि:शेष ) भाग जात असेल, येणारा भागाकार सम संख्या असतो. 
5) प्रत्येक दशक गटात सम संख्येची बेरीज हि विषम संख्येच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त असते.         
  •  1 ते 10  एक दशक गट , बेरजेतील फरक = 5   
  •  1 ते 40  चार  दशक गट , बेरजेतील फरक = 5 × 4 = 2        
  •  31 ते 50  दोन  दशक गट , बेरजेतील फरक = 5 × 2 = 10

                सरावसाठी खाली क्लिक करा.            

  ⇓    

CLICK HEAR

                                  




1 comment: