- रोमन संख्या / संख्याचिन्हे -
रोमन संख्याचिन्हे
|
I
|
V
|
X
|
L
|
C
|
D
|
M
|
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे
|
1
|
5
|
10
|
50
|
100
|
500
|
1000
|
I, V, X या संख्याचिन्हांच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम –
1) I व X यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. 1) II = 1 + 1 2) XX = 10 + 10
2) I व X ही चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात. V हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. 1) III = 1+1+1 2) XXX= 10+10+10 3) 15 ही संख्या VVV अशी लिहित नाहीत.
3) I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. VI = 5+1 = 6 VII = 5+1+1 = 7 XI = 10+1 = 11 XV = 10+5 = 15
4) I हे चिन्ह V किंवा X च्या डावीकडे लिहिले, तर त्याची किंमत डावीकडील संख्येतून वजा केली जाते. [ (अ) I हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते. (ब) V हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाहीत.] IV = 5-1= 4 IX = 10 – 1 = 9 [ 8 ही संख्या IIX अशी लिहित नाहीत.]
5) 10 च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून, वरील नियमानुसार लिहितात. XXIII=10+10+1+1+1=23, XIV=10+4=14, XXIX=10+10+9=29
सरावासाठी क्लिक करा.
⇓
🔵
खालील comment box मध्ये आपले मत नोंदवा. सूचना लिहा.
आणि
Publish ला क्लिक करा.
⇓
🔵
खालील comment box मध्ये आपले मत नोंदवा. सूचना लिहा.
आणि
Publish ला क्लिक करा.
Good Work.
ReplyDeleteप्रत्येक घटकांवर चाचणी पाठवा.
ReplyDeleteछान सराव झाला आहे.
मुलांचा खूपच छान सराव होतो.
ReplyDeleteधन्यवाद सर
Super project sir
Deleteखूपच छान सराव होतो
ReplyDeleteधन्यवाद